Shala Marathi Kavita
शाळा
तिथे नसे खडू तिथे नसे फळा,
शाळा भरे जंगलात कधी भरे शेतावर,
अक्षरफुले आमची काळ्या मातीवर,
आभाळाची माया झाडांची शीतल छाया,
उंच,विशाल भक्कम पाहू पर्वतांची काया
नदीबाई गुनगुनत पुढे पुढे जाते,
अडचणीतून मार्ग काढाया शिकविते
पशु,पक्षी आमचे येथे सवंगडी
एकोप्याने राही सारे नसे रडारडी
खुशाल यावे तुम्ही भेटते धरती आई
दंग होई मन पाहून नवलाई
आमची आहे दोस्तानो आगळीवेगळी शाळा
दंग होई मन पाहून नवलाई
आमची आहे दोस्तानो आगळीवेगळी शाळा
0 comments :
Post a Comment