Marathi Kavita on Life
निळ्या नभांगणात सुरु झाली
नक्षत्रांची चमचमणारी रात्रशाळा
ग्रह,तारे,चांदोबा,चांदण्या
विद्यार्थी सारे झाले गोळा.....|
आईने चांदोबाला शाळेसाठी शिवला
चंदेरी सुंदरसा अंगरखा
चंदोबा तो घालून येता
सारे पहाती टकामका......|
आधी घट्ट नंतर सैल
अंगरखा चांदोबाला लागला होऊ
सवंगडी चेष्टा थट्टा करुनी
चांदोबाला लागले चिडवू......|
हिरमुसल्या रडवेल्या चांदोबाला बघून
आईला वाईट वाटले मनापासून
नाराजीने अंगरखा घेतला काढून
चांदोबा उघडा फिरतो तेव्हापासून....|
Marathi Kavita On Zara
अवखळ झरा
गावाला आले मित्र चार,धिंगाणा घालून करी बेजार
एक म्हणे गावाचा डोंगर चढू,फुलपाखरासारखे खाली-वर उडू
दुसरा म्हणे दुपारी डोंगरावर जाऊ,थंडगार पाण्यात पोहत राहू
तिसरा म्हणे बांधाने गाडीसारखे पळू,उंच-उंच गवतात लपंडाव खेळू
चौथा बोले सारखा शेतावर फिरू,भरल्या पिकाची राखण करू,
चौघा मित्रांच्या जरी चार तऱ्हा पण प्रत्येक जन एक अवखला झरा
चौघा मित्रांच्या जरी चार तऱ्हा पण प्रत्येक जन एक अवखला झरा
0 comments :
Post a Comment